जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली मोहोळकर यांची पदोन्नतीने बदली

by Team Satara Today | published on : 23 August 2025


सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली मोहोळकर यांची आरोग्य विभाग उपसंचालक मुंबई येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. या पदोन्नती बद्दल त्यांचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नुकतेच अभिनंदन करण्यात आले.

डॉ. मोहोळकर गेल्या 23 वर्षापासून वैद्यकीय विभागात सक्रिय आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मिरज मेडिकल कॉलेज येथे झाले. त्यानंतर सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 2000 सालापासून त्या सक्रिय होत्या. कुष्ठरोग नियंत्रण केंद्र कराड व सातारा येथे त्या सक्रिय राहिल्या. त्यानंतर जिल्हा रुग्णालय सातारा व जिल्हा रुग्णालय पुणे औंध येथे वर्ग एकच्या त्वचारोग तज्ञ म्हणून त्यांनी काम केले. ऑक्टोबर 2024 पासून त्या पुन्हा जिल्हा रुग्णालय सातारा येथे त्वचारोग तज्ञ म्हणून सक्रिय होत्या. त्यांची आता पदोन्नतीने मुंबई येथे आरोग्य उपसंचालक म्हणून बदली झाली आहे. 

या पदोन्नतीनिमित्त त्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल खाडे यांनी अभिनंदन केले. याशिवाय डॉ. सुपेकर, डॉ. कोंडे, डॉ. अरुंधती कदम, डॉ. प्रियांका मेश्राम, अधिपरिचारिका रुबीना शेख, करिष्मा मुल्ला, शुभांगी चव्हाण, अनुपमा पवार, अधिपरिचारिक प्रतीक थोरात, नागेश शिंदे, शेषनारायण चोले, निवेदिता मुद्गुंडीया सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2025 च्या टी शर्ट व जिंगल ट्यूनचे अनावरण संपन्न
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन; एकावर गुन्हा

संबंधित बातम्या