01:35pm | Sep 03, 2024 |
टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधले बरेच कलाकार आता बदलले आहेत. मालिकेत सोनू च्या भूमिकेत सुरुवातीला दिसलेली अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच झीलने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बीचसाईड लोकेशनवर तिने ही पार्टी केली.
झील मेहताला तारक मेहता का उल्टा चश्मा मधून लोकप्रियता मिळाली होती. पाच वर्ष काम केल्यानंतर तिने मालिका सोडली होती. आजही झीलला सगळे सोनू म्हणूनच ओळखतात. तारक मेहतानंतर झीलने अभिनयाला रामराम केला. ती मेकअप आर्टिस्ट म्हणून इंटरेस्ट होता. तिच्या आईसोबत मिळून तिने बिझनेसही उभा केला. झील मेहता बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाआधी झीलने तिच्या मित्रपरिवारासोबत बॅचलर पार्टी एन्जॉय केली. यासाठी झीलने फ्लोरल ड्रेस परिधान केला होता. यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. समुद्रकिनारी तिने हे फोटोशूट केलं आहे. 'ब्राईड टू बी' चं शोल्डर स्ट्रॅपही तिने घातलेलं दिसत आहे. या आऊटफिटमध्ये तिने फोटोशूट केलं आहे. 'गर्ल्स जस्ट वॉन्ट हॅव अ फन' असं कॅप्शन लिहिलं आहे.
झीलच्या या फोटोवर मालिकेतील रोशन भाभी म्हणजे जेनिफर मिस्त्रीनेही कमेंट केली आहे. 'अभिनंजन झीलो..कशी आहेस बाबू' अशी तिची कमेंट आहे. याशिवाय झीलनंतर जिने सोनू ची भूमिका साकारली ती अभिनेत्री निधी भानुशालीनेही तिचं अभिनंदन केलं आहे.
झील आणि आदित्य दुबे कॉलेजपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्याची कबुली देत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आदित्यने जानेवारी महिन्यात झीलला प्रपोज केले होते. यानंतर दोघांचा साखरपुडाही झाला. आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |