सातारा : महिलेच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एप्रिल महिन्यात (नक्की तारीख आठवत नाही) वाई शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी संतोष गुलाब चव्हाण आणि कलावती गुलाब चव्हाण दोन्ही रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा या दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.