02:09pm | Jan 10, 2025 |
सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा. या शैक्षणिक संकुलाचा संस्थेचे सचिव संजीव माने यांच्या संकल्पनेतून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी सत्कार, लोकसहभागातून शाळा विकास अभियान शुभारंभ, शिवकला दिनदर्शिका प्रकाशन समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्रसिध्द उद्योजक बाळासाहेब गोनुगडे (उद्योग समुह सातारा) दलितमित्र माधवराव साठे (सामाजिक कार्यकर्ते न्यू विकासनगर सातारा) यांच्या शुभहस्ते सौ. श्वेता खरे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता) यांचे अध्यक्षतेखाली संस्थेचे संचालक छगन पटेल, बळवंत फडतरे, सौ. वासंती माने, कु. मनिषा कदम, ऍड. मनजीत माने, प्राथमिक विभाग शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अमोल काटे, माध्यमिक विभाग अध्यक्ष शामराव पवार, माता-पालक संघ प्राथमिक विभाग अध्यक्षा मा.सौ.निलम खामकर, माध्यमिक विभाग अध्यक्षा सौ. सिमा वाघमारे, परिवहन समितीचे प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा सौ. काजल जगताप, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष दादा जाधव आदीं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू कला मंदिर सातारा या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमप्रसंगी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 मध्ये संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याना ह. भ. प. सौ. गोदावरी नलवडे स्मृती पुरस्कार देवून, विविध क्रीडा स्पर्धा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना दलितमित्र कै. दादासाहेब साठे स्मृती पुरस्कार देवून तसेच प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे कै. सुभराव रामचंद्र माने स्मृती पुरस्कार, कै. सोनाजी लक्ष्मण माने आदर्श स्मृती पुरस्कार तसेच माध्यमिक विभागातील शाळेमध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांस कै. शामराव बंडू ढाणे स्मृती पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्मृतिचिंन्ह रोख रक्कम, पुष्प असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.
याप्रसंगी संस्थेचे संचालक ऍड. मनजीत माने, संस्थेचे खजिनदार श्री दत्तात्रय काळे यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापून शाल, श्रीफळ, बुके देवून तसेच पेढे भरवून शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या हितचिंतक सौ. श्वेता खरे यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी तसेच सौ. अनिता गुरव यांची अंगणवाडी सेविका पदी निवड झालेने संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पेढे देवून मान्यवर व संस्थाचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेने या शैक्षणिक संकुलासाठी गेल्या 37 वर्षामध्ये यथाशक्ती सर्व सोयी सुविधा, भौतिक सुविधा पुरविल्या आहेतच. परंतू सद्यस्थितीमध्ये शाळांना आवश्यक असणार्या बाबींचा शाळा विकास आराखडा शाळेने तयार केला असून या बाबी लोक सहभागातून पुर्णत्वास नेण्याचा शाळा प्रशासनाने संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मानस केला आहे. लोकसहभागासाठी शाळेने केलेल्या आवाहनाचे निवेदन उपस्थितांपुढे सादर करून, त्याचे वाचन करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी याच कार्यक्रमामध्ये प्रसिध्द उद्योजक बाळासाहेब गोनुगडे यांनी 51000/- रूपये तसेच संपूर्ण कामे पुर्ण होणेसाठी विविध कंपन्यांच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत मिळवून देणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमास यावेळी आर्वजून उपस्थित राहिलेले प्रसिध्द टी. व्ही. स्टार व अभिनेते पत्रकार मधूकर खरे यांनी शाळा व संस्थेच्या कार्याबदद्ल गौरवोद्गार काढले व त्यांचे मातोश्रीच्या स्मृती प्रित्यर्थ यापुढे विविध कलांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणार्या विद्यार्थ्याना पुरस्काराने सन्मानित करण्याचे तसेच शाळेतील 5 विद्यार्थी दत्तक घेण्याचे व कला, अभिनय क्षेत्रामध्ये विशेष अभिरूची असणार्या विद्यार्थ्याना अभिनय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
संस्थेच्या व शाळांच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकणार्या तसेच संस्थेच्या आगामी कार्याच्या व शाळांच्या उपक्रमांच्या वाटचालीचा आरसा असणार्या ‘‘शिवकला दिनदर्शिकेचे’’ प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यानी आकर्षक नृत्ये, गायन, वादन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विविध आकर्षक वेशभूषेमध्ये वैयक्तीक व सांघिक नृत्ये, लोकगीते सादर करून, उपस्थितांची वाहवा मिळवून मने जिकंली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वैशाली भिसे, प्रास्ताविक कु. प्रतिभा जाधव, आभार कु. अर्चना नावडकर यांनी मानले.
कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक शरद गुरव, चंद्रहार माने, श्रीमती घोलप, प्राथमिक-माध्यमिक विभागातील शाळा व्यवस्थापन कमिटी, माता-पालक कमिटी, परिवहन समितीमधील सर्व सदस्य, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. पालकांनी मोठया संख्येने सहभागी होवून, शाळेच्या उपक्रमांबदद्ल समाधान व्यक्त केले.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |