सातारा : सातारा व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 3 ठिकाणी कारवाई केली. मल्हार पेठेत चोरी छुपके चालणारा चक्री जुगार अड्ड्याचाही पोलिसांनी पर्दाफाश केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील मल्हार पेठ येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणारा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत माणिक शिंदे (वय 26, रा. मल्हार पेठ, सातारा), सौरभ उर्फ कुक्या कैलास खरात (रा. मल्हार पेठ, सातारा), मोहम्मद अली मुल्ला (रा. शनिवार पेठ, सातारा), ओमकार नारायण कांबळे (वय 27, रा. मल्हार पेठ, सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस विक्रम माने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पोलिसांनी दि. 23 सप्टेंबर रोजी मल्हार पेठ येथे ही कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरुन जुगाराचे साहित्य जप्त केले.
जुगार प्रकरणी दुसरी कारवाई परशुराम वामन पवार (वय 26, रा. सदरबझार, सातारा) याच्या विरुध्द करण्यात आली आहे. त्याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 630 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सदरबझार येथील सार्वजनिक शौचालय परिसरात केली आहे.
मोळाचा ओढा, सातारा येथे जुगार प्रकरणी एलसीबीने तिसरी कारवाई सतिश कृष्णा शिंदे (वय 46, रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 2852 रुपये व जुगाराचे सहित्य जप्त केले. संशयित हा अनिल भिुक मिठापुरे याच्यासाठी जुगार घेत होता.
सातारा शहरसह शाहूपुरी पोलिसांचे 3 जुगार अड्ड्यांवर छापे; मल्हार पेठेत चोरी छुपके चालणारा चक्री जुगार अड्ड्याचाही पर्दाफाश
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा