सातारा : जिल्हा रुग्णालय आयुष विभाग, एनसीडी विभाग, आयसीआयसी विभाग, मानसिक विभाग यांच्या सहायाने दि. 21 जानेवारी रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनानुसार या शिबीरामध्ये आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी इ. पॅथीनुसार उपचार करण्यात असून आहारविषयक व ॠतुचर्या, दिनचर्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेद तज्ञ डॉ. संजीवनी शिंदे यांच्याकडून उपस्थित रुग्णांना संधीवात, आमवात, आम्लपित्त, मुळव्याध यासारख्या आजारावर, होमिओपॅथी तज्ञ डॉ. अभिजीत भोसले यांच्यामार्फत जुनाट त्वचा विकार, श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांवर तसेच युनानी तज्ञ डॉ. आफशा खान यांच्याकडून मधुमेह, मुळव्याध, संधीवात यावर उपचार करण्यात आले. योग तज्ञ पुरब आनंदे यांच्याकडून उपस्थित रुग्णांकडून योगासने करुन घेण्यात आली. एनसीडी विभागातील अमोल काळे व नताशा मुलाणी यांनी उपस्थित रुग्णांची रक्तदाब तपासणी व रक्तातील साखर तपासणी करण्यात आली. पल्लवी सापंते व जया कदम यांनी रुग्णांचे हिमोग्लोबीन तपासणी, अनिल भुंबे व सुहासी महामुनी यांनी एचआयव्हीची तपासणी केली तर मानसिक आरोग्याविषयी अर्पणा बल्लाळ व निलांबरी चौधरी यांनी जनजागृती केली. आसिफ आत्तार व प्रियंका जाधव यांनी शिबीर व्यवस्थापन केले.
मुख्याध्यापक प्रल्हाद पार्टे व सांबरवाडीचे सरपंच सौ. फडतरे व उपसरपंच भणगे तसेच सांबरवाडीचे ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. शेकडो रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला.