11:53am | Dec 02, 2024 |
सातारा : युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या जयंतीनिमित्त मर्ढे येथील त्यांच्या स्मारकात मसाप, शाहुपुरी शाखा आणि मर्ढे ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य तर अध्यक्षस्थानी मर्ढेच्या सरपंच सविता शिंगटे होत्या. यावेळी मान्यवरांनी मर्ढेकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
काही महिन्यापूर्वींच मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मर्ढे येथील कवी बा.सी. मर्ढेकरांच्या घराचे नूतनीकरण आणि त्याचे स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. रविवारी कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांच्या जयंतीनिमित्त मर्ढेकरप्रेमींनी त्यांना अभिवादन केले. यावेळी मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने प्रा. अजित साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. या गावाला कवितेच्या गावाचा दर्जा मिळावा यासाठी मसाप, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडून प्रयत्न सुरु असून त्याला लवकरच यश मिळेल अशी खात्री वाटते. मर्ढेकरप्रेमी अजित जाधव यांनी ही वास्तू जोपासली जावी यासाठी मी विनोद कुलकर्णी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्यामुळेच आज या घराचे नूतनीकरण आणि त्याचे स्मारकात रुपांतर झाले आहे. मर्ढेकरांच्या साहित्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना सरपंच सविता शिंगटे यांनी ज्याप्रमाणे मर्ढेकरांच्या घराचे मसाप शाहुपुरी शाखेने पुढाकार घेऊन स्मारक केले. त्याचप्रमाणे शासनानेही लवकरात लवकर शासकीय स्मारकाचे उदघाटन आणि लोकार्पण घ्यावे. वाचनालय सुरु करुन मर्ढे गावाच्या विकासासाठी भरघोस निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन वजीर नदाफ यांनी तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य मानसिंग शिंगटे, अकुंश कदम, अजित जाधव, वजीर नदाफ, तुषार महामूलकर, सतीश घोरपडे, अशिष पवार, प्रशांत गाढवे, हेमंत पंडित, राजेंद्र जगताप आणि मर्ढे ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |