सातारा दि २० ( प्रतिनिधी )
सातारा जिल्ह्याला खासदार उदयनराजे यांच्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांच्या रूपाने आणखी एक खासदार मिळणार आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन पैकी एका जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी कोट्यातून नितीन पाटील बुधवारी दुपारी राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. या वृत्तामुळे वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात विशेषतः नितीन काका समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान नितीन काकांना मी खासदार करतो असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई येथील सभेत दिला होता तो त्यांनी पाळल्याने शब्दाचा पक्का वादा अजितदादांचा शब्द ग्हणजे काळ्या दगडावरची रेघ हे पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील असे भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतली होती महायुतीत सातार लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बदल्यात राज्यसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे मागितली होती हि जागा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे त्यामुळे वाईसह राष्ट्रवादीच्या गोटात आनंद द्विगणित झाला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाई येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर वक्तव्य केले होते की माहितीच्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा मी नितीन काकाला खासदार करतो नाहीतर पवारांच्या अवलाद सांगणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. शब्दाचा पक्का वादा अजितदादा याची प्रचिती पुन्हा सातारा जिल्ह्याने अनुभवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. बुधवारी दुपारी १२ वाजता नितीन पाटील राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .
राज्यसभेच्या निमित्ताने नितीन काका यांची नवी राजकीय इनिंग सुरू होत असून सातारा जिल्ह्याला पाटील यांच्या रूपाने दुसरा खासदार मिळाला आहे.