सातारा : तीन लाख रुपये किमतीच्या बस बार्शी चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 मार्च ते 21 जुलै दरम्यान पॉवर हाऊस उपकेंद्राचे येथून तीन लाख रुपये किंमतीचे अंदाजे तीनशे किलो वजनाचे 73 बस बार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद पंकज तात्यासो खिलारे (रा. विसावा नाका, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.