सूरत : गुजरातच्या सूरत शहरातील वेसू परिसरात असलेल्या अल्ट्रा लक्झरी अशा हॅप्पी एक्सेलेंशिया रहिवाशी अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग इतकी भीषण होती, की क्षणार्धात अनेक मजले आगीच्या विळख्यात सापडले. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
सुरत फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसच्या टिम्स तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. शहरातील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत आहेत. या बिल्डिंगला लागलेली भीषण आग होती की अनेक किलोमीटर दूरवरुण आगीचे लोळ दिसून येत होते.