सातारा : स्व. बी.पी.पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगांव-बरावंत ता. निफाड जि. नाशिक येथील इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या वाहनाचा वाठार ता. कराड जि. सातारा गावाचे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर मालवण जि. सिंधुदुर्ग येथून परत जाताना आज पहाटे 6.45 वाजता अपघात झाला आहे. एसटी बसमधील विद्यार्थ्यांवर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत.
या बसमध्ये आव्हाड ओंकार गोरखनाथ, शेजवळ आदित्य लक्ष्मण, भालेराव सत्यम ज्ञानेश्वर, शिंदे सूरज संजय, मोरे चिन्मय विलास, संदे वेदांत विलास, रोहामारे कृष्णा विशाल, वाधवने अंकित विठ्ठल, अहेर पार्थ संजय, वाघ यशराज योगेश, अहेर प्रज्वल दिगंबर, भुतडा अदित्य विजय, अहेर प्रणव योगेश, गागुंडे प्रसाद राजाराम, बर्वे प्रेम मुकेश, महाले यश चंद्रकांत,भामरे संकेत सुनिल, मालसाने आदित्य राजेंद्र, दाते कृष्णा किशोर, शेटे स्वरित अनंत, देशमुख अथर्व दिपक, शिंदे लोकेश अनिल, गाडे सार्थक भाऊसाहेब, सोनावणे अनिकेत प्रविण, जाधव प्रणव योगेश, बनकर सार्थक राजेंद्र, जाधव यश रविंद्र, गायकवाड यश शरद, काळे सार्थक विनोद, जगताप संकेत हेमंत, पगार स्वयंम गणेश, जगताप सार्थक दत्तात्रय, थेटे श्रेयश किरण, खोडे सार्थक चंद्रकांत, वाघ ईश्वर प्रभाकर, मोगल साहिल किरण, चव्हाण उदय प्रशांत, मोरे अश्विन योगेश, गवळी सार्थक सुरेश, पाचोरकर ऋषिकेश विठ्ठल, गवळी यश संतोष, शेळके पियुष अनिल, जाधव सार्थक संतोष, शेळके संस्कार सतीश, कादबाने रोहित हिरामन, शिंदे जय नितीन, निखाडे अथर्व दत्तात्रय, उगले कृष्णा ज्ञानेश्वर, राठोड जगदीश नामदेव, वाणी ओम जितेंद्र.
सर्वतोपरी सहाय्य करण्याच्या सूचना
अपघाताच्या ठिकाणी तसेच हॉस्पिटल येथे आमदार अतुल भोसले, आमदार दिलीपराव शंकरराव बनकर, कुलपती कृष्णा विश्व विदयापीठ मलकापूर सुरेश भोसले तसेच उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसिलदार कल्पना ढवळे यांनी भेट देऊन आपत्कालिन मदत व उपाययोजना केलेली आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच शिक्षण व क्रीडा मंत्री दादा भुसे यांनी लगेच जखमींची विचारपूस केली व सर्वतोपरी सहाय्य करण्याच्या सूचना दिल्या.
कराड येथे मदत कक्ष सुरु
तहसिल कार्यालय कराड येथे मदत कक्ष सुरु करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 02164-222212 आहे. तसेच या व्यतिरिक्त विशेष मदत म्हणून विजय कणसे. वैद्यकिय अधिकारी, कृष्णा हॉस्पिटल कराड दुरध्वनी क्रमांक 02164-241555 ते 58, बाबुराव राठोड, निवासी नायब तहसिलदार कराड मोबाईल नंबर 9403683271, महेश पाटील मंडळाधिकारी मलकापूर कराड मोबाईल नंबर 9922955155 यावर संपर्क साधावा.