सहाय्यक कृषि अधिकारी संघटना फलटण तालुकाध्यक्षपदी विलास काळे यांची निवड

नव्या कार्यकारिणीची घोषणा; निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

by Team Satara Today | published on : 17 October 2026


फलटण : महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना शाखा फलटणची त्रैवार्षिक निवडणूक २०२६ नुकतीच अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीचा अधिकृत निकाल घोषणापत्राद्वारे जाहीर करण्यात आला असून फलटण तालुका अध्यक्षपदी विलास काळे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुका कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी सागर लाळगे, सचिवपदी शंभूराज ताटे, कोषाध्यक्षपदी गौरव यादव, प्रसिद्धीप्रमुखपदी सागर पवार तर संघटकपदी अरविंद नाळे यांची निवड झाली आहे. विविध मंडळांच्या उपाध्यक्षपदी विडणी मंडळातून सुनील निकम, बरड मंडळातून वैभव निंबाळकर, फलटण मंडळातून नितीन शिंदे आणि तरडगाव मंडळातून अजित चतुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून सुरेखा लडकत व अंजली बोडरे यांची निवड झाली असून, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अमित रणवरे आणि संजय ढालपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय कोंडलकर व सह निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पवार यांनी पाहिले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन सोनवलकर यांची विशेष उपस्थिती होती. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवदुर्गेच्या रूपांतून समाजक्रांतीचा जागर; कामेश कांबळे यांच्याकडून ९ कर्तृत्ववान क्रांतीज्योतींना अभिवादन

संबंधित बातम्या