सातारा : 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. एच. आय. व्ही/एड्स बाबत समाजामध्ये व युवकांच्यामध्ये व्यापक जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचून त्यानां तपासणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी एच. आय. व्ही/एड्स अभियानातंर्गत वेगवेगळे जनजागृती उपक्रम राबविण्यात येतात.
1 डिसेंबर रोजी शिवाजी सर्कल, पोवई नाका सातारा येथे सायं. 6 वा. एच. आय. व्ही/एड्स आजाराने मृत्यू पावलेल्या निष्पाप लोकानां श्रध्दाजंली वाहण्यासाठी व संबंधित कायदयाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा रूग्णालय सातारा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅलीच्या शुभारंभ कार्यक्रमावेळी विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित राहाणार असून उपस्थित युवकानां एचआयव्ही/एड्स विरोधी शपथ देण्यात येणार आहे.
दिनांक 2 डिसेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 या दरम्यान सातारा जिल्हयामधील सर्व महाविद्यालयातील / अकॅडमीमधील युवक/युवतींसाठी जनजागृतीपर व्याख्यानाचे व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून 30 नोव्हेंबर 2024 पर्यत 18 वर्ष ते पुढील वयोगटातील नागरिक व महाविद्यालयीन युवकांच्यासाठी सोशल मिडीया पोस्ट मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. विजेत्यानां पारितोषीक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहीतीसाठी मोबाईल ९८२२९३३७८७ / ९६५७९६६०१९ या कमांकावरती संपर्क करावा. दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी विहान प्रकल्प यांचे समन्वयाने एचआयव्ही सहजीवन जगणा-या युवक युवती यांचेसाठी श्रवस्ती हॉल, करंजे, सातारा येथे वधू वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. तसेच संपुर्ण जिल्हयामध्ये होर्डि'ग्ज, वॉल पेंटींग, सातारा रेडीओ वरून मुलाखत प्रसारण द्वारे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.