देविका मंगल कार्यालयाजवळ अपघातप्रकरणी बुलेट चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 May 2026


सातारा : दुचाकी अपघात प्रकरणी बुलेट चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वाठार -सातारा रस्त्यावरील देविका मंगल कार्यालयाजवळ मुकुंद मारुती जाधव (रा. विकास नगर, सातारा) याने त्याच्या ताब्यातील बुलेट दुचाकी (क्र. एमएच 11 डीडब्ल्यू 6193) भरधाव वेगात, बेदरकारपणे चालवून सुनील मानसिंग काशीद रा. यादोगोपाळ पेठ, सातारा यांच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एम एच 11 बीजी 8988)  ला समोरासमोर जोराची धडक देऊन अपघात केला. या अपघातात तक्रारदारांसह त्यांचे चुलत भाऊ प्रभाकर मल्हारी काशीद हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार साठे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मालगाव गावच्या हद्दीत धोम डावा कालव्‍यात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
पुढील बातमी
पती-पत्नीस मारहाणप्रकरणी सासपडे येथील दोन जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या