सदर बाजारातील बागवान गल्ली परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा : सदर बाजारातील बागवान गल्ली परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण जुगार मटका अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे स्वीकारून आकड्यांवर कल्याण जुगार चालवित असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आले.
दि. 7 रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सदर बाजार, बागवान गल्लीतील सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. यावेळी मंगलदास शिवदास बाबर (वय 55, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा) हा कल्याण जुगार मटका चालविताना मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून रोख 430 रुपये तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुन्या भांडणातून धारदार शस्त्र घेवून शाहूपुरी येथील तरुणासह आईला दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
महाबळेश्‍वरमध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक करताना तिघे ताब्यात; महाबळेश्‍वर पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या