सातारा : हौशी कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सचिन मोटे यांच्या संकल्पनेतून "कास- कला आणि संस्कृतीची" व "सातारा रंगकर्मी यांच्या वतीने कै. अंजली वामनराव थोरात (थोरात बाई) यांच्या नावाने एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष होते. नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, अकोला, सिंधुदुर्ग, बुलढाणा, कोल्हापूर, कराड, बारामती, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा अशा अनेक शहरांतून जवळपास 50 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेला आपली हजेरी लावली. ही स्पर्धा खुला गट आणि शालेय गट (वय 16 पर्यंत) आशा दोन गटात पार पडली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शेखर कुलकर्णी, अवधूत पुरोहीत, कौस्तुभ दिवाण या मान्यवरांनी काम पाहिले. थोरात बाईंची धाकटी कन्या विभावरी शिंदे आणि सुनबाई सुजाता थोरात या वेळी उपस्थित होत्या. तुषार भद्रे, संतोष पाटील, प्रकाश टोपे, कल्याण राक्षे हे मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
प्रसाद नारकर, संजय मोटे, प्रसाद देवळेकर, मिलिंद वाळिंबे, जितेंद्र खाडिलकर, ओंकार पाठक, रविना गोगावले, केतन मोहिते, शशांक वाडेकर, चकोर देशमुख, मेघा मोटे, बाळकृष्ण शिंदे यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे : मोठा गट - हणमंत शिंदे (प्रथम), सुजित यादव (द्वितीय), स्नेहा धडवई नाळे (तृतीय), उत्तजनार्थ - योगेश चव्हाण, सुरज भोसले, वैष्णवी गोळे, परीक्षक प्रोत्साहन- विष्णू निंबाळकर.
छोटा गट - देवदत्त घोणे (प्रथम), वेदांत महाडिक (द्वितीय), मिताली मगदूम (तृतीय), उत्तेजनार्थ - शाश्वत भोसले, प्रचितेस काळमेख, कादंबरी साबळे, परीक्षक प्रोत्साहन - प्रथमेश कांबळे.