सातारा : नगरपालिकेच्या निवडणूकीत प्रभाग क्र.16 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार अॅड. दत्तात्रय गणपत बनकर आणि वैशाली प्रकाश राजेभोसले यांच्या कमळ चिन्हाचा बोलबाला आहे. सातारा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदावर असताना गोडोली परिसराच्या चौफेर विकासाने व्हिजन, कायदेशीर ज्ञान, निधी खेचून आणण्याचे कौश्यल्य, राजकियदृष्टया सक्षम आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख निर्माण करणाऱ्या अॅड. दत्तात्रय गणपत बनकर तथा डि. जी. बनकर आणि महिला संघटनातून पुढे आलेल्या वैशाली राजेभोसले यांना प्रभाग क्र.16 साठी नगरसेवक म्हणून निवडून देत कमळच फुलवण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करणारे अॅड. डि. जी. बनकर आणि वैशाली राजेभोसले हे स्थानिक उमेदवार प्रभाग 16 साठी भाजपचे अधिकृत दिले आहेत. प्रभागासाठी गतीशील विचार आणि विकारात्मक धोरण घेऊन दोन्ही उमेदवार निवडणूकीला सामोरे जात आहेत. अॅड. डि. जी. बनकर यांनी यापुर्वी गोडोली परिसरातील विकास कामे, विविध लोकप्रिय उपक्रम, अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या ]िवरोधकांना आरोप करण्यासाठी एक शब्दपण नाही.
शहर आणि परिसरात राजमाता कल्पनाराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या कल्पना विकसित करण्यासाठी सर्वोत्तम योगदान अॅड. डि. जी. बनकर यांनी आजपर्यंत दिले आहे. प्रभाग 16 मधील आयुर्वेदिक गार्डन उभारणी करण्यात अॅड. डि. जी. बनकर यांचे परिश्रम असून त्यांना याच प्रभागात गरज ओळखून आवश्यक प्रस्तावित कामे करण्याचा जाहिर वचन मतदारांना दिले आहे.
अॅड. डि. जी. बनकर आणि वैशाली राजेभोसले यांच्या प्रचारार्थ मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढलेल्या फेरीतील गर्दी पाहता मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील, असे स्पष्ट चित्र दिसते. मनोमिलन पॅटर्नमुळे प्रभाग 16 मधील दोन्ही राजांचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करतात. प्रभागातील सर्व मतदारांना थेट ओळखणारे दोन्ही उमेदवार असून कमळ हेच चिन्ह सर्वांना माहित झाल्याने जवळपास ही निवडणूक एकतर्फी वाटू लागली आहे.