जिल्हा रुग्णालयात बालकांची हृदयरोग तपासणी

ना. शिवेंद्रसिंहराजेंची संकल्पना; २० रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

by Team Satara Today | published on : 10 March 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये ८४ बालकांची टूडी ईको तपासणी करण्यात आली. त्यातील २० गरजू बालकांवर आवश्यक हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

सध्या मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून त्यामध्ये व्यस्त असतानाही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील हृदयविकार असणाऱ्या बालकांची तपासणी व उपचार करण्याबाबत प्रशासनाला सूचना करून शिबिराचे आयोजन केले. तसेच त्यांनी खारघर येथील सत्यसाई हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा करून तेथील तज्ञ वैद्यकीय पथक सातारा जिल्हा रुग्णालयात बालकांच्या तपासणीसाठी पाठवले. या पथकामध्ये डॉ. जयश्री मिश्रा, डॉ. ऋषिकेश वडके, डॉ. सई पाटील, डॉ. गायत्री, कोऑर्डिनेटर सागर सावंत यांच्यासह नर्सिंग स्टाफ सहभागी होता. या सर्वांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, डॉ. मधुरा पाटील, डॉ. राहुल यादव, हेमा बाबर, आर्या पेंढारकर, डीपीएस फर्झाना यांचे सहकार्य मिळाले. 

या शिबिरामध्ये एकूण ८४ बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर २० बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय पथकाने निश्चित केले. या बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संबंधित बालकांवर शस्त्रक्रिया तसेच आवश्यक उपचार तातडीने होण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू
पुढील बातमी
आ. रवींद्र धंगेकर काँग्रेसमधून बाहेर

संबंधित बातम्या