01:41pm | Nov 06, 2024 |
सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका युवकाने विद्यमान आ. महेश शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, पुसेगाव पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केल्याने या युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या पक्षपाती मुजोर पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत, संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून, एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आले आहे. अशातच ओंकार बाबासो शिंदे (वय.२१) रा. डिस्कळ ता. खटाव येथील युवकाने कोरेगाव मतदारसंघाचे विद्यमान आ. महेश शिंदे यांचा एका कार्यक्रमादरम्यान डान्स करतानाच्या व्हिडिओचे व्हाट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यामुळे दि.५ रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान, पुसेगाव पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी सबंधितास बोलावून घेत, तू हा स्टेटस का ठेवला? असा प्रश्न विचारत संबंधित युवकास अर्वाच भाषेत शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत संबंधित युवकाचा हात मोडला. संबंधित युवकांनी यासंदर्भात कोणाची तक्रार आहे का? असा प्रश्न केला मात्र पोलिसांनी काही एक न सांगता मारहाण सुरूच ठेवली. यानंतर पोलिसांनी संबंधित युवकाचा मोबाईल पोलिसांनी जमा केला. मोबाईल जमा केल्याचा पंचनामा अथवा यासंदर्भात कोणतेही कागदपत्र संबंधित युवकाला दिले नाही. यानंतर मारहाण झालेल्या ओंकार शिंदे यांनी याबाबतची लिखित तक्रार सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, झालेल्या घटनेचे निषेधार्थ आज दि. ६ रोजी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांना कायदा हातात घेऊन, निष्पाप युवकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) चे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पुसेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्याआंदोलन करीत सपोनि. पोमन यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आ. शिंदे यांनी केली.
निवडणूक निर्णय अधिकारी ही ‘बेबंदशाही’ मोडून काढणार काय?
पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि. यांनी टाकलेल्या तुकड्याला जागत एका निष्पाप युवकाला कोणाच्यातरी सांगण्यावरून अनाधिकाराने बेदम मारहाण केली. त्याचा मोबाईल काढून घेतला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. याद्वारे एखाद्याची बदनामी होत असेल तर, कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारे जर कायदा हातात घेत असतील, आणि त्याद्वारे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करीत असतील, तर हे पोलीस दलाला शोभनीय नाही. सध्या निवडणुकांमुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे. नेमून दिलेल्या नियमानुसार सरकारी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. असे असतानाही पुसेगाव पोलीस ठाण्यातील सपोनि. पोमण यांनी कुठलीही तक्रार नसताना, युवकास केवळ व्हाट्सअप स्टेटस ठेवले म्हणून, अनाधिकाराने त्याचा मोबाईल जमा करीत, त्याला हात मोडेपर्यंत बेदम मारहाण केली. शेवटी यासंदर्भात लोकांना मोर्चा काढावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याप्रकरणी लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करून, कोरेगाव तालुक्यातील ‘बेबंदशाही’मोडून काढावी अशी मागणी होत आहे.
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा |
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
शाहूनगरमधील घरफोडीची उकल |