सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चारभिंती ते अजिंक्यतारा किल्ला रस्त्यावर पत्र्याच्या शेडच्या आडोशाला दि. 25 रोजी गौरव दत्तू मोरे (वय 52, रा. केसरकर पेठ, सातारा) हे संशयास्पद लपून बसले होते. त्याच्यावर पोलीस हवालदार सुजीत भोसले यांनी कारवाई केली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.