सातारा : येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंच येथे सार्वजनिक रस्त्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरुन वादावादी केल्याप्रकरणी सात ते आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. २ रोजी घडला.
मयूर संजय साबळे, दतन्या असादरे, सनी अडसूळ, अप्पा मोहन भवाळ, दत्ता रामचंद्र जाधव ऊर्फ मालिक, रोहित वाघमारे व दत्ता जाधव यांचा मेव्हना व साडू यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार पोतेकर तपास करत आहेत.