जुन्या एमआयडीसीतील संगमनगर परिसरात तीन लाखांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 02 November 2025


सातारा :  जुन्या एमआयडीसीतील संगमनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ रोजी सकाळी ११ ते दुपारी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान गणेश नामदेव जाधव (रा. संगमनगर, सातारा) यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. घटनास्थळी सातारचे पोलीस उप अधीक्षक राजीव नवले यांनी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळ्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाईटच्या खांबाला धडक देत ट्रक पलटी; विचित्र अपघातात अकरा लाख रुपयांचे नुकसान
पुढील बातमी
राज्यातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाना ३३ अर्जांवर कार्यवाही सुरू; गाळप हंगामास सुरुवात

संबंधित बातम्या