सातारा पोलिसांच्या सीयुजी मोबाईल नंबरचा लोकार्पण सोहळा

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हँडसेट चे वाटप

by Team Satara Today | published on : 19 May 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीला नियंत्रित ठेवणे आणि सामान्य जनतेशी संपर्क वाढवणे या दृष्टीने सातारा जिल्हा पोलिसांना स्वतंत्र कॉमन युजर ग्रुप चे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. या सी यु जी नंबरचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. या व्यवस्थेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी, शाखा या संबंधित काही सूचना, तक्रारी, महत्त्वाची माहिती नागरिकांना द्यायची असेल तर त्यांनी ती माहिती सी यु जी मोबाईल नंबर वर संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी. ही माहिती एसएमएस अथवा व्हॉट्सऍप च्या माध्यमातून दिली जाऊ शकते. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या सूचना व तक्रारी व्हॉट्सऍप मेसेज द्वारे मोबाईल नंबर वर द्याव्यात. यामुळे सामान्य जनतेशी पोलिसांचा संपर्क वाढणार आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी   हा अभिनव उपक्रम राबवला जात असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.

ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आज या मोबाईल नंबर चे सिम कार्ड व हँडसेट विविध पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना देण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती.


पोलीस अधीक्षक सातारा मोबाईल क्रमांक - 9223006101

अपर पोलीस अधीक्षक - 9223 0061 02

पोलीस उपाधीक्षक गृह विभाग - 922300103

पोलीस निरीक्षक सातारा शहर - 9223006104


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर
पुढील बातमी
मोना स्कूल परिसरात चैन स्नॅचिंग

संबंधित बातम्या