लोणंद : सालपे (ता. फलटण) येथील बेपत्ता असलेल्या माय-लेकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या गावच्या हद्दीतील कोळेकर वस्ती शेजारी असलेल्या पंधरकी नावाच्या शिवारातील विहिरीत हे मृतदेह सापडले. माय-लेकराच्या बेपत्ता नोंदीनंतर बुधवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
सौ. माधुरी लक्ष्मण कचरे (वय 28) व शंभुराज लक्ष्मण कचरे (वय- 7, दोघे रा. सालपे, ता. फलटण) अशी या मृत माय-लेकराची नावे आहेत. सौ. माधुरी व मुलगा शंभुराज सोमवार, दि. 30 रोजी सायंकाळी 5 नंतर बेपत्ता झाले होते. परिसरात तसेच नातेवाईकांकडे त्यांचा शोध कुटुंबीयांनी घेतला; परंतु ते सापडत नव्हते. त्यानंतर त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली. दरम्यान, बुधवारी या दोघांचेही मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळले. विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी दादा यशवंत कचरे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पो.ना. मदने करत आहेत.