एडवोकेट असीम सरोदे गुरुवारी साताऱ्यात

न्यायिकता व लोकसुरक्षा या विषयावर व्याख्यान देणार

by Team Satara Today | published on : 26 August 2025


सातारा : सातारा विधानसभा मतदार संघाचे  1952 ते 1962 या कालावधीतील आमदार,  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षातील लढाऊ नेतृत्व व कष्टकरी वर्गासाठी आयुष्यभर लढणारे स्मृतीशेष कॉ व्ही एन पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूरचे वकील आणि संविधान विश्लेषक एडवोकेट असीम सरोदे यांचे गुरुवारी साताऱ्यात कॉ व्ही एन पाटील स्मारक समिती सातारच्या वतीने‌व्याख्यान आयोजित केलेले आहे अशी माहिती स्मारक समितीचे सेक्रेटरी एडवोकेट कॉ.वसंतराव नलावडे व कॉ. विजय निकम यांनी दिली.

एडवोकेट असीम सरोदे हे "न्यायिकता व लोक सुरक्षा"  या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत. गुरुवार दि 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दैवज्ञ सांस्कृतिक भवन, समर्थ मंदिर जवळ,  सातारा येथे हे व्याख्यान  कॉ. व्ही. एन. पाटील स्मारक समिती सातारचे अध्यक्ष कॉ अतुल दिघे यांच्या अध्यक्षतेखाली व स्मारक समितीचे संस्थापक सदस्य एडवोकेट रवींद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या महत्त्वपूर्ण अशा विषयावरील व्याख्यानास लोकशाही प्रेमी नागरिक ,  कामगार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते तसेच कायदे विषयक अभ्यासक,  संविधान अभ्यासक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कॉ शंकर पाटील व कॉ प्रमोद परामणे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत : माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह
पुढील बातमी
सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या