सातारा : सीबीआय पोलिस असल्याचे सांगून मुलाला गुन्ह्यात अटक करण्याचे कारण सांगून सेवानिवृत्त पोलिसाला व्यक्तीची ५ लाख ३५ हजार ५९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधीत सेवानिवृत्त पोलिस ७४ वर्षांचे आहेत. दोन ते १२ ऑगस्ट या कालावधीत त्यांना एका मोबाईलवरून फोन आला होता. कुलाबा पोलिस ठाण्यातील सीबीआय पोलिस असल्याचे त्याने त्यांना सांगितले. त्यानंतर मुलाला गुन्ह्यात अटक करायची असल्याचे सांगून प्रकरण मिटवायचे असल्यास पैसे द्यावे लागतील असे त्याने संबंधीत सेवानिवृत्त पोलिसाला सांगितले. त्यामुळे घाबरलेने त्यांनी संबंधीत व्यक्तीला वेळावेळी ५ लाख ३५ हजार ५९९ रुपये पाठविले. अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक सावंत्रे तपास करत आहेत.