भीमाबाई आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी; कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते होणार म. फुले विचारमंथन व्याख्यानमालेचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार प्रदान सोहळा व महात्मा जोतीराव फुले जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या यावर्षीच्या चाळीसाव्या थोरांच्या-स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के  यांच्या हस्ते येत्या शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नगर वाचनालयाच्या  पाठक हॉलमध्ये महात्मा फुले स्मृतिदिनी होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी दिली.
यावर्षीचा अठ्ठाविसावा  मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार केंद्र सरकारच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख, इतिहास अभ्यासक, संशोधक, ढोर-चांभार समाजातील महिलांचे आंबेडकर चळवळीतील योगदान उजेडात आणणाऱ्या प्रसिद्ध लेखिका डॉ. सुनीता सावरकर यांना शनिवारी प्रदान करण्यात येणार आहे.
युगकर्ते  महात्मा  जोतीराव फुले यांच्या क्रांतिकारक विचाराच्या मंथनावर होणाऱ्या यावर्षीच्या  व्याख्यानमालेत  महाराष्ट्रातील मान्यवर विचारवंत,साहित्यिकांची भाषणे होणार आहेत. त्यामध्ये रविवारी २९ नोव्हेंबर रोजी  'महात्मा फुलेंचा  शेतकऱ्याचा असूड ' विषयावर डॉ. जगदिश सोनवणे  (अहिल्यानगर), सोमवार ३० नोव्हेंबर ' सत्यशोधक चळवळ काल व आज '-  डॉ. श्रद्धा कुंभोजकर ( पुणे), मंगळवार १ डिसेंबर' महात्मा फुले व स्त्री -पुरुष समता' - डॉ. सोनिया कस्तुरे  ( सांगली), गुरुवार ३ डिसेंबर ' महात्मा फुलेंची धर्मचिकित्सा ' -डॉ. विश्वनाथ शिंदे ( पुणे), शुक्रवार ४ डिसेंबर ' महात्मा फुलेंचा शिक्षण विचार '- प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार ( लातूर), शनिवार ५ डिसेंबर ' भारतीय वर्तमान वास्तवात महात्मा फुले समजून घेताना ' - डॉ. मिलिंद कसबे  ( नारायणगाव )
या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे, हौसेराव धुमाळ, सहकार्यवाह  डॉ. सुवर्णा यादव, अतिरिक्त सहकार्यवाह अशोक भोसले, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विश्वस्त जयपाल सावंत, अनिल बनसोडे, केशवराव कदम,अशोक कांबळे व प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रीतिसंगमावरील भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा; समाधीस्थळी अभिवादन
पुढील बातमी
महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी दत्ताजी सणस यांची बिनविरोध निवड; प्रमुख कार्यवाहपदी महेश सावंत-पटेल

संबंधित बातम्या