दिल्ली : मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात ३० हून अधिक आदिवासी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलांच्या पालकांना भेटण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके पोहोचले. या भेटीदरम्यान, उशीर झाल्याबद्दल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि स्थानिक माध्यमांनी त्यांच्यावर टीका केली. या घटनेनंतर, अभिजीत दीपके यांनी आज सोशल मीडियावर उपहासाने जाहीर केले की ते मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहेत. दीपके यांनी सोशल मीडियावर एक पत्र प्रसिद्ध करून स्वतःला मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री घोषित केले आणि आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आता अभिजीत दीपके यांच्या अटकेची मागणी होत आहे.
अभिजीत दीपके यांच्या राजीनाम्याच्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. बालाघाटमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना विचारलेल्या प्रश्नांचे व्हिडीओ आधीच व्हायरल होत होते आणि आता त्यांच्या अटकेची मागणीही सुरू झाली आहे. त्यांची उपहासात्मक राजीनाम्याची पोस्ट वाचल्यानंतर, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असल्याचा खोटा दावा केल्याबद्दल आणि स्वतःची ओळख चुकीच्या पद्धतीने मांडल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर दाखल केला पाहिजे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, स्वतःची खोटी ओळख सांगितल्याबद्दल आणि सरकारी लेटरहेडचा गैरवापर केल्याबद्दल अभिजीत दीपके यांना तुरुंगात टाकले पाहिजे.
अभिजीत दीपके यांच्या पत्रात काय?
रविवारी सोशल मीडियावर हे पत्र प्रसिद्ध करून अभिजीत दीपके यांनी या विषयावर उपहासात्मक भाष्य केले. आपल्या उपरोधिक पत्रात अभिजीत यांनी लिहिले आहे की, ते मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून त्यासाठी आज मध्य प्रदेशच्या राज्यपालांची भेट घेणार आहेत.
बालाघाटला पोहोचल्यावर जेव्हा अभिजीत यांना प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की लोकांनी त्यांना विधानसभेवर निवडून दिलेले नाही, त्यामुळे त्यांनी हे सर्व ठीक करावे अशी अपेक्षा लोकांनी करू नये. अभिजीत दीपक म्हणाले की, त्यांनी हे सर्व प्रश्न मुख्यमंत्री आणि राज्य प्रशासनाला विचारायला हवे होते.
स्वतःला मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री घोषित करत अभिजीत दीपके यांचा राजीनामा; राजीनाम्याच्या पोस्टमुळे वाद , कायदेशीर कारवाईसह FIR नोंदवण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा