01:12pm | Sep 30, 2024 |
सातारा : महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणाा घेऊन महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील 289 कोटींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.
सी.एम. म्हणजे कॉमन मॅन असल्याचे समजून कार्य करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. लोकांच्या हाताला काम देण्याचे कार्य शासन करीत आहे. समाजातल्या विविध घटकांसाठी अत्यंत महत्वकांशी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून कार्य करित असल्यानेच महाराष्ट्र आज उद्योग, विकास, पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी बाबींमध्ये अग्रेसर आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या योजनेमुळे महाराष्ट्रातील असंख्य बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. ही योजना कधीही बंद न होता टप्प्याटप्प्याने यामध्ये मिळणाऱ्या निधीत वाढ होत राहिल. वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत असणारी अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून 12 तापोळा या डोंगरी भागाप्रमाणे पाटण हा डोंगरी तालुका आहे. जिल्ह्यातील जल पर्यटनाला चालना देण्याचे काम करण्यात आले. तारळी नदी उपसा सिंचन प्रकल्पातील पाणी १०० मीटरपर्यंत पोहोचवले. मोरणा गुरेघरच्या उजव्या-डाव्या कालव्याला बंदिस्त पाईप लाईन करण्याचे काम दोन दिवसात सुरू होईल. नाटोशी हे संपूर्ण गाव आणि वाड्या-वस्त्या पाण्यापासून वंचित होत्या. त्यासाठी जलसिंचन योजनेचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगून पाटण तालुक्यातील नाडेगावात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजन, मल्हारपेठ येथील ग्रामसचिवालयाच्या नूतनीकरण इमारतीचे लोर्कापण आदींचे विकासाचे भूमीपुजन व लोर्कापण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |