सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास योगेश भीमराव खरात सध्या रा. विकासनगर, सातारा याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने चालवून गणेश चौक ते क्रेन कंपनी रस्त्यावर अपघात केला. या अपघातात त्याच्या मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेला त्याचा मित्र सुहास गुलाबराव साळुंखे रा. विकास नगर, सातारा याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी योगेश खरात याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.