लक्ष्मी टेकडी परिसरात महिलेस मारहाण; मंगळसूत्र हिसकावल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 11 June 2026


सातारा : लक्ष्मी टेकडी परिसरात एका महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत फिर्यादीच्या आजीवर दगडाने हल्ला करून तिला जखमी करण्यात आल्याचाही आरोप आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 9 जून रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर छाया शेलार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चेतन नाटेकर आणि सुनील आडवे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वरकुटे-मलवडी येथील अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; 1.13 लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क व पोलीस दलाची संयुक्त कारवाई
पुढील बातमी
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या