दहिवडीच्या उत्कर्षा जाधवला मानाचे ‘रिव्हॉल्व्हर’ ; सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरतानाच, मानाच्या ‘रिव्हॉल्वर’चाही मान पटकावला

by Team Satara Today | published on : 10 June 2026


सातारा : त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कवायत मैदानावर दहिवडी (ता. माण, जि. सातारा) येथील प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षक उत्कर्षा जाधव हिने १२७ व्या तुकडीचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरतानाच, मानाच्या ‘रिव्हॉल्वर’चाही मान पटकावला. राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्वर आणि चषक विजेत्यांना प्रदान करण्यात आला. 

राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान विविध पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या प्रशिक्षणार्थींना चषक प्रदान करण्यात आला. प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षक उत्कर्षा शशिकांत जाधव यांना सर्वोच्च मानाचा पुरस्कार व मानाची रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आला.

यासह सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरचा किताब कै. यशवंतराव चव्हाण चषक, सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचा अहिल्याबाई होळकर चषकही प्रदान करण्यात आला. जाधव या दहिवडी (ता. माण, जि. सातारा) रहिवासी असून, त्यांचे वडील नुकतेच एसआरपीएफच्या दौंड पोलिस प्रशिक्षण केंद्रातून पोलिस उपनिरीक्षकपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांचा भाऊही मुंबई पोलिसमध्ये सेवा बजावत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याच्या सुपुत्राचा शौर्यगौरव; लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगेंना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र
पुढील बातमी
कोयना जलाशयात मुनावळे परिसरात फ्लेमिंगोंचा मुक्काम; पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

संबंधित बातम्या