नवीन एमआयडीसीत सुमारे 27 हजारांची घरफोडी

सातारा : नवीन एमआयडीसीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 27 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ते 27 जानेवारी दरम्यान नारायण बबनराव खटावकर रा. आपुलकी नगर, नवीन एमआयडीसी, सातारा यांच्या बंद घराचा कडी कोयंडा, कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील 26 हजार 900 रुपये किंमतीचे चांदीचे साहित्य व रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.


मागील बातमी
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
एकाच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या