गुजरातच्या सूरत येथे कापड बाजारात भीषण आग

शेकडो दुकानं जळून खाक, अग्निशनमच्या 50 पेक्षा जास्त गाड्या दाखल

by Team Satara Today | published on : 27 February 2025


सूरत : गुजरातच्या सूरत येथे कापड बाजारात भीषण आग लागली. गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा ही आग लागली. या आगीत लक्षणीय वाढ झाल्याने ही आग मार्केटच्या पाचव्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सूरतमधील शिवशक्ती कापड बाजारात भीषण आग लागली. मार्केटमध्ये सुमारे 800 दुकाने असून, ती सर्व कपड्याची आहेत. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि जवळपास संपूर्ण इमारतीला आग लागली.

सूरतमध्ये लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आग किती प्रमाणात पसरली आहे, हे पाहायला मिळत आहे. अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आणखी पसरण्यापासून रोखले असले तरी या आगीमुळे शिवशक्ती टेक्सटाईल मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या इमारतीला आग लागली तेथे सुमारे 800 दुकाने असल्याने आग आटोक्यात आणण्याचे हे आव्हान होते.

या घटनेनंतर सुरतच्या पोलिसांनी सांगितेल की, अग्निशमन विभागाच्या पथकांनी शिवशक्ती टेक्सटाईल मार्केटमधील आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी बाधित क्षेत्र रिकामे केले. या आगीत किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवशक्ती मार्केटमध्ये 800 पेक्षा जास्त कापडाची दुकाने असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपासच्या बाजारपेठांमधील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.

सर्व 800 दुकाने बंद करण्यात आली आहेत. या बाजाराशिवाय आजूबाजूची इतर दुकानेही बंद करण्यात आली आहेत. दुसरीकडे, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मोठी आग लागल्याचे सांगितले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५० हून अधिक गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या सर्व वाहनांच्या चार ते पाच फेऱ्या झाल्या. आग विझवण्यासाठी सुमारे 200 अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीचे थकीत पाणी बिल माफीचा निर्णय

संबंधित बातम्या