विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांनी भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 23 September 2026


सातारा  :  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना, आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी 'भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान ही विशेष मोहिम दि. २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी राबविण्यात येत आहेत व त्यानंतरचे नियमित अभियान प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येणार आहे.              या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांसाठी मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.  
विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना तसेच मूलभूत हक्कांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. तरी सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी संबंधित तालुका व मंडळस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांच्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे आणि शासनाच्या विविध योजना, सेवा व प्रमाणपत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आयुष विभागामार्फत ११ वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

संबंधित बातम्या