सातारा : बागडवाडा,गोडोली येथे ४ जणांनी एका महिलेला फरशीच्या तुकड्याने,हाताने मारहाण केल्याची घटना दि. १० रोजी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,अनिल शिवाजी साळुंखे (वय ४०, रा. बागडवाडा, गोडोली सातारा) यांच्या घराशेजारी त्यांच्या बहिणीच्या मुलीचे व शेजारील मुलीचे भांडण सुरू होते. ती सोडवण्यासाठी अनिता साळुंखे या गेल्या असताना मुलीला का ओरडते असे म्हणत शीतल सचिन मोरे यांनी फिर्यादीचे केस ओढले तर सचिन हणमंत मोरे याने फरशीच्या तुकड्याने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले. तर शांताबाई बाळासाहेब साळुंखे आणि हिराबाई हनुमंत साळुंखे यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत.