सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी अक्षय रमेश भोसले रा. माळवाडी, आंबेदरे रोड, सातारा हा युवक राहत्या घरातून मी बाहेर जाऊन येतो, असे सांगून निघून गेला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.