सातारा : महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या समन्वय बैठकीकडे भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवली .त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर नो कॉमेंट्स म्हणत पालकमंत्र्यांना लवकरच वेगळी भूमिका जाहीर करू असे सांगण्याची वेळ आली. त्यामुळे भाजपच्या विरोधात शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट एकत्र येण्याची शक्यता बळावली असून दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाची स्वबळावर चाचणी सुरू असून त्यांच्याकडून 25 जागा उभ्या केल्या जाणारा असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियांना सोमवारपासून पुन्हा गती मिळणार आहे .उमेदवारी अर्ज भरताना महायुतीच्या घटक पक्षांना लढतीचे धोरण ठरवावे लागणार होते .पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी समन्वय बैठकीचे आयोजन केले होते .मात्र भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे व ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांनी पाठ फिरवली .साताऱ्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई,सातारा लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर व भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम यांचीच बैठक झाल्याचा दावा करण्यात आला.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी पालकमंत्र्यांना विचारले असता बैठकी संदर्भात तुम्ही धैर्यशील कदम यांना विचारा असे पालकमंत्री यांनी सांगत पुढील राजकीय समीकरणात संदर्भात नो कॉमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली. मग महायुती तुटली काय असे विचारल्यावर यासंदर्भात स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपण माहिती देऊ असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुलाखतींच्या सत्रामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भलतेच आक्रमक झाले. पाटण विधानसभा मतदार संघासाठी विशेष पॅकेज देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहेत. पालकमंत्री कोणीही असले तरी भारतीय जनता पार्टी आता थांबणार नाही. तेथील विकास कामांना कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी थेट आव्हानाची भाषा गोरे यांनी करत पालकमंत्री शंभूराजे यांना आव्हान दिले. सत्यजितसिंह पाटणकर यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या मागे ताकद उभी केली जाईल त्यामुळे गटातटाचे राजकारण न करता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे लढावे असे आवाहन त्यांनी केले. पाटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक सकाळी 11 वाजता पाटण येथे बोलवण्यात आली आहे.
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या चर्चेच्या वाटाघाटी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप वगळून जुळवलेल्या राजकीय समीकरणांना भारतीय जनता पार्टीच्या आक्रमक पावित्र्याने बळ दिले आहे. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी युती झाली नाही तर प्रत्येक जण स्वबळावर लढायला मोकळा आहे, असे स्पष्ट संकेत दिल्याने महायुतीचे साताऱ्यात जुळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराजे हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्र येणारअसल्याचे राजकीय चित्र स्पष्ट होत आहे या संदर्भात अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होणार असल्याची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी पालकमंत्र्यांचा चहा का गोड होता याचे अत्यंत आता पुढे येत असलेल्या राजकीय समीकरणांवरून येत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्ह्यात स्वबळावर लढणार
सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी गट हा स्वबळावर लढणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या प्रयत्न सपशेल फसला. तयारीसाठी कमी कालावधी मिळाल्याची कारण त्यावेळी शिंदे यांनी दिलेले होते. भक्कम जनाधार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्ह्यामध्ये अगदीच केविलवाणी अवस्था झाली असून उमेदवार मिळताना सुद्धा त्यांची दमछाक होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत गटात आणि गणात जिथे ताकद आहेत अशा निवडक 25 जागांवर उमेदवार उभे करून राष्ट्रवादी आपल्या आव्हान कायम ठेवणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाशी जुळवून घेण्याची भूमिका दोन दिवसापूर्वी मांडण्यात आली होती मात्र त्याचे राजकीय परिणाम नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये दिसून आल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने वेगळी भूमिका घेतस्वतंत्र जाण्याचे धोरण ठेवले आहे. इच्छुक उमेदवारांनी आत्ताच मुंबईत जाऊन एबी फॉर्म आणून ठेवल्याची माहिती आहे.