शाहूनगर परिसरातील लॉजिंगमध्ये अश्लील कृत्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 June 2026


सातारा : सातारा शहरातील शाहूनगर परिसरातील सावंत कॉलनी येथे असलेल्या शिवनेरी स्नॅक्स सेंटर व लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित लॉजिंगमध्ये काही व्यक्ती अश्लील कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान स्नॅक्स सेंटर चालकाने अशा कृत्यासाठी अपप्रेरणा दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सचिन अर्जुन पुडेकर (वय 22, सध्या रा. अहिरे कॉलनी, अमरलक्ष्मी, सातारा; मूळ रा. दातेवाडी, ता. खटाव), श्रेयश संतोष जगताप (वय 19, रा. वडगाव, ता. फलटण) तसेच एका 19 वर्षीय युवतीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ताटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लिंब ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीला गती देण्याची मागणी; जिल्हा परिषदेसमोर ग्रामस्थांचे उपोषण
पुढील बातमी
बनावट चलन सादर करून जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या