मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सदरबाजारात एकतेचा संदेश; उत्साहात निघालेल्या जुलूसमध्ये सामाजिक ऐक्याचे दर्शन

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सातारा : प्रेम, करुणा, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सदर बाजारातील जामा मशीद येथून उत्साहपूर्ण वातावरणात जुलूस काढण्यात आला. विविध समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदवल्याने या उपक्रमातून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.

जुलूसदरम्यान माणुसकी, परस्पर सन्मान आणि गरजूंच्या मदतीचा संदेश देण्यात आला. समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच देशात शांतता, सलोखा आणि सर्वधर्मीयांमध्ये परस्पर विश्वास कायम राहावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

जुलूसच्या प्रारंभी पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, नगरसेवक निशांत पाटील, नगरसेवक बाळासाहेब खंदारे, सामाजिक कार्यकर्ते विशाल कोळी, आरपीआय युवक अध्यक्ष प्रतीक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक बिले, माजी नगरसेवक संजय साठे, सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव, बबलू सोलंकी, तानाजी बनगे, रोहित शितोळे, सुनील भुतकर, सतीश कांबळे, रमेश कांबळे, विकास धुमाळ यांच्यासह जामा मशीदचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मौलानांनी देशातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शांतता, एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी विशेष प्रार्थना केली. प्रेम, सहिष्णुता आणि सामाजिक एकतेचा संदेश देत जुलूस उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते सादिक बेपारी, नजीर बागवान, मकसूद मुल्ला, सलीम मेमन, शकील घोणे, महंमद बागवान, इस्माईल मुल्ला, शकील काझी, असद मुल्ला, हसन शेख यांच्यासह जामा मशीदचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नेपाळमधील महापुरात १०० हून अधिक भारतीय बेपत्ता; भोटे कोशी नदीला अचानक पूर, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये का देण्‍यात आला सतर्कतेचा इशारा
पुढील बातमी
कोयत्याने हल्ला झालेल्या स्नेहलच्या संघर्षाचा अखेर अंत, अडीच महिने सुरु होती मृत्यूशी झुंज, पालघर येथे घडली होती संतापजनक घटना

संबंधित बातम्या