सातारा : मारहाण प्रकरणी 10 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर, ता.सातारा येथे 10 जणांच्या टोळक्याने प्लास्टीक पाईप, हाता-पायाने मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनील अंबादास राठोड (वय 27, रा. सैदापूर) यांनी सुनील गाढवे, अक्षय मोहिते, रोहन माने, गायकवाड, गौरव, सार्थक, अमित कदम (पूर्ण नावे, पत्ते माहित नाहीत) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 30 मे रोजी घडली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.