सातारा : वाढे, ता.सातारा गावच्या हद्दीत पेढे विक्रेत्यांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून मारामारी झाली. यावरुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजित जाधव यांनी कविता इंदलकर, सौरभ सिंग, आयुष इंदलकर, रिंकू राज यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार आयुष इंदलकर यांनी अजित जाधव, वसिम खान, मोनू बगेल, रवि बगेल यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 10 ऑक्टोबर रोजी पेढ्याच्या दुकानासमोर घडली आहे. दगड, काठीने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.