सातारा : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यादव सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची नेमणूक कोरेगाव, माण, फलटण व वाई या मतदार संघासाठी झाली आहे. ते आयकर विभाग आग्रा येथे कार्यरत आहेत.
आज त्यांनी कोरेगाव, माण, फलटण व वाई मतदार संघाचा दौरा केला असून प्रांताधिकारी तसेच सहायक खर्च निरिक्षक यांचेसमवेत बैठकी घेतलेल्या आहेत. अरुणकुमार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422658175 असा असून त्यांचा मुक्काम सर्कीट हाऊस सातारा येथे आहे.