सातारा : देगाव फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 एप्रिल रोजी रात्री पावणे आठ ते आठ वाजण्याच्या दरम्यान देगाव फाटा येथील सातारा चिकन सेंटरच्या समोर पार्क केलेली अभिजीत दिलीप तिताडे रा. शाहूपुरी, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 डीएफ 6312 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.