सातारा : तडीपारीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन सातार्यात बिनधोकपणे फिरणार्या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिली कारवाई शाहूनगर येथे रोहित जितेंद्र भोसले (वय 22, रा.प्रतापसिंहनगर, सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.
दुसरी कारवाई शिवराज पेट्रोलपंप परिसरात अमीर सलीम शेख (वय 23, रा. वनवासवाडी ता.सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. दि. 23 ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.