सातारचा सूर्या श्वान सुवर्णपदकाचा मानकरी

रांची येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यात झाला बहुमान

by Team Satara Today | published on : 18 February 2025


सातारा : सातारा पोलीस दलाचा सूर्या नावाचा श्वान 68 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पहिल्यांदाच सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. यामुळे एक्सप्लोझिव्ह इव्हेंट मध्ये त्याने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले असून महाराष्ट्र पोलीस तसेच सातारा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रांची येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यात देशातील 28 राज्य स्पेशल फॉर्सेस व केंद्रशासित प्रदेश असे मिळून एकूण 44 संघांनी सहभाग नोंदवला होता. एक्सप्लोझिव्ह इव्हेंट विभागात लगेज, सर्च ग्राउंड, सर्च कार, सर्च फूड आणि आज्ञाधारकपणा अशा विविध प्रकारात ही स्पर्धा पार पडली. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या सूर्या नावाच्या श्वानाने एक्सप्रेस विभागात सुवर्ण पदक प्राप्त केले. त्या कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूर्या श्वानाचे हँडलर पोलीस हवालदार निलेश दयाळ आणि सेकंड हॅन्डलर सागर गोगावले यांचे विशेष अभिनंदन केले.

गेल्या सहा वर्षापासून सूर्या पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, गृह उपाधीक्षक अतुल सबनीस, पोलीस उपनिरीक्षक शेखर कडव यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्याने ही कामगिरी पार पाडली. भविष्यात सातारा जिल्हा पोलीस दलातील इतर श्वान अशा पद्धतीची कामगिरी करून जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचातील, असा विश्वास पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फ्रॉड झालेले सुमारे दीड कोटी मिळाले मालाज कंपनीला परत
पुढील बातमी
अपघातातील जखमीचा मृत्यू

संबंधित बातम्या