सातारा : राजकीय दृष्ट्या जागृत असणारा तालुका म्हणून जिल्ह्यात जावली तालुक्याकडे बघितले जाते. गेली 15 वर्ष या तालुक्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची एक हाती सत्ता आहे. असे असताना सत्तेच्या लोभापायी पोट भरण्यासाठी वळचणीला आलेले टक्केवारी किंग पाय पसरू लागले असून, याच टक्केवारी किंग ने आज चक्क कुडाळ मधील भाजपा कार्यालयातच ’राडा’ केल्याने या राड्याची चर्चा आज दिवसभर संपूर्ण जावली तालुक्यात होती.
याबाबत माहिती अशी की, कुडाळ गावामध्ये अल्पसंख्यांक समाजाची दफनभूमी आहे. या दफनभूमीचे काम मीच करणार असा अट्टाहास अल्पसंख्यांक समाजातीलच असणाऱ्या एका टक्केवारी किंगने केला. परंतु या टक्केवारी किंगच्या कामाचा आणि ऐकूनच त्याचा सामाजिक दर्जा काय आहे. याची माहिती कुडाळसह पंचक्रोशीत असल्याने साहजिकच अल्पसंख्याक समाजातील लोकांसह गावातीलच ज्येष्ठ लोकांनीही याला विरोध केला. कुडाळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे काम होणार असल्याने, सर्वसामान्य होतकरू तरुण ठेकेदारांना याचे काम मिळाले पाहिजे असा शुद्ध हेतू ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अल्पसंख्याक समाज व गावातीलच प्रतिष्ठित नागरिकांचा होता. परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला, आणि मीच महाराजांच्या जवळचा असा स्वयंघोषित टक्केवारी किंगने दफनभूमीचे काम मीच करणार, या कामाचे वाटप मीच करणार आणि याच प्रेस्टिज इशूमु गावामध्ये वादाची ठिणगी पडली.
यानंतर कुडाळ मधील काही प्रतिष्ठित व्यक्ती दफनभूमीच्या प्रस्तावित कामाच्या पाहणीसाठी गेले असता या टक्केवारी किंगने स्वतः मालक असल्याचे अविर्भावात संबंधितांना तुम्ही कोणाला विचारून इकडे आलात असा प्रश्न केला? वास्तविक सार्वजनिक ठिकाणी कोणीही कधी जाऊ शकतो. परंतु दफनभूमीची मालकी हक्क माझाच आहे. असा अविर्भाव दाखवून संबंधित टक्केवारी किंगने आपली लायकी दाखवून दिली.
यानंतर ही घटना होऊनही संबंधित टक्केवारी किंगची मुजोरी एवढी वाढली की त्याने कुडाळ मधील भाजप कार्यालयात जाऊन राडा केला. कार्यालयात पोचल्यानंतर त्याने धक्काबुक्की –बुकलाबुकली सुरू केली.
भाजपा देशभरात नव्हे तर जगभरामध्ये शिस्तप्रिय पक्ष ओळखला जातो. मात्र मी महाराजांच्या जवळचा आणि आता तर त्यांना मंत्रीपद मिळाले आहे. मी कोणालाही घाबरत नाही अशा अविर्भावातच संबंधित टक्केवारी किंगने ‘राडा’ केला या राड्याची चर्चा कुडाळसह संपूर्ण जावळी तालुक्यात होती.
मीच तालुक्याचे राजकारण चालवतो, मंत्रीपदाच्या निर्णयात माझं चालतं, असं ’पालपुद’ मिरवणाऱ्या टक्केवारी किंग नकट्या ठेकेदाराने पक्षाची, नेत्यांची आणि गावकऱ्यांची अब्रू धुळीस मिळवली आहे. त्यामुळे नेत्यांनी अशा भ्रष्ट, नतदृष्ट, नकट्या टक्केवारी किंगला पाठीशी घालू नये तसेच त्याने स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचे आणि पक्षाच्या नावालाही बट्टा लावण्याचे काम केलेले आहे. अशा टक्केवारी किंगला त्याची जागा दाखवून त्याची त्वरित सामाजिक,आर्थिक नाकेबंदी करावी अशी मागणी कुडाळसह जावली तालुक्यामधून होत आहे.
जनतेचा सवाल – हेच का भाजपा?
भाजपा पक्षाची स्थापना मोठ्या संघर्षातून झालेले आहे या संघर्षामध्ये अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. शिस्त, परिश्रम आणि संघटन ही त्रिसुत्री भाजपमध्ये चालत असते. परंतु स्वतःच्या फायद्यासाठी अनेक जण आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे. असे भासवून आपले उखळ पांढरे करत असतो. कुडाळ मधील टक्केवारी किंग हा सुद्धा याच पठडीतला, टक्केवारी किंग च्या भानगडी मिटवण्यासाठी चक्क तालुक्यातील ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांना पाचरण करण्यात आले. परंतु त्यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला ही या नवीन सेलच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कळवंडी सोडवता सोडवता नाकी नऊ आले. गेल्या पंधरा वर्षांमध्ये प्रथमच एका पक्षाच्या कार्यालयामध्ये अशा कळवंडी आणि बुकला–बुकली झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. आणि सेलच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात भाजप पक्ष धाराशाही केला आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार आत्मकेंद्री पदाधिकाऱ्यांना थेट निलंबित करावे अशी मागणी देखील, चार तासांच्या राड्यानंतर झालेल्या वसंतराव मानकूमरे यांनी केली आहे.
पक्षाच्या प्रतिमेला लागलेला डाग पुसायला हवा !
जावळी तालुक्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या कळवंडीमुळे तालुक्यात भाजपची प्रतिमा मलिम झाली आहे. टक्केवारी किंग नवीन चेहरा बनवून पक्षाची पाळीमुळे पोखरण्याचे काम करीत आहे. याच्या बेजवाबदार सनकी वृत्तीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. वसंतराव मानकुमरे तसेच तालुकाध्यक्षांनी संबंधित ठिकाणी धाव घेऊन कळवंड थांबवली अन्यथा याचा दुष्परिणाम भाजप सह संपूर्ण गावकऱ्यांना भोगावे लागला असता. संबंधित टक्केवारी किंग च्या भानगडीमुळे पक्षाच्या प्रतिमेला जो डाग लागलेला आहे. त्यासाठी एकच उपाय तो म्हणजे त्याची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक नाकेबंदी. झाल्याशिवाय संबंधित मस्ती कमी होणार नाही. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून पक्षाच्या प्रतिमेला जो डाग लागलेला आहे तो डाग पुसायला हवा अशी मागणी जावली तालुक्यातील तमाम जनता करीत आहे.