कलरचे डबे बदलून न दिल्याच्या कारणावरून एकास मारहाणप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 June 2026


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रेहान अझरुद्दीन मणेर (रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्या देगाव फाटा येथील कलर पेंटच्या दुकानामध्ये कलरचे डबे बदलून न दिल्याच्या कारणावरून मणेर यांना राजेंद्र साळुंखे व त्यांची दोन्ही मुले (पूर्ण नावे व पत्ता माहीत नाही) यांनी लाकडे दांडक्याने मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सैनिक स्कूल कॅम्पसमधून सुमारे एक लाखाच्या साहित्याची चोरी

संबंधित बातम्या