सातारा : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी कुलदीप सिद्धार्थ कांबळे (रा. सदरबझार, सातारा) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असता दि. 23 रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.