अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू

सातारा : रस्ता अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संगम माहुली, सातारा येथील कृष्णा नदीवरील पुलावर शंकर बाळासाहेब रसाळ रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा क्र. एमएच 12 एचसी 1272 भरधाव वेगात चालवून अक्षय यशवंत ठाणे यांच्या दुचाकीस धडक देऊन ही रिक्षा पुलास धडकली. या अपघातात शंकर रसाळ यांचा मृत्यू झाला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.



मागील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता

संबंधित बातम्या